अंशत: अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना वाढीव २० % अनुदान मंजुरी

Loading imageअंशत: अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना वाढीव २० % अनुदान मंजुरी

महाराष्ट्रातील शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत व त्यांचे इतर सहकाऱ्यांनी मंत्रालयात आमरण उपोषण पुकारले होते. उपोषणाच्या चौथ्या दिवशी मा. आ. दत्तात्रय सावंत यांची प्रकृती खालावल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तरी त्यांनी उपोषण सुरूच ठेवले होते. याची दखल घेत शासनाने मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत अंशता अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांवरील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव २० टक्के अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटून शिक्षक बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.