मा. आमदार श्री. दत्तात्रय अच्युतराव सावंत, जुलै २०१४ मध्ये झालेल्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांना विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये काम करता आले. विधान मंडळातील सर्व राजकीय पक्षाने तालिका सभापती म्हणून त्यांची निवड केली, त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या व शिक्षकांच्या प्रश्नावर शासनाला निर्णय घेण्यासाठी भाग पाडता आले. अजूनही अनेक प्रश्नावर त्यांचा पाठपुरावा चालू आहे. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाही मार्गाने त्यांचे प्रयत्न चालू आहेत.
शेतकरी कुटुंबातल्या सामान्य व कोणतेही राजकीय पाठबळ अथवा वारसा नसणाऱ्या कार्यकर्त्याला सहकाऱ्यांचे असं सच्च बळ मिळालं तर काय होऊ शकतं, याचं जागृत उदाहरण म्हणजे मा. आमदार श्री. दत्तात्रय अच्युतराव सावंत. शिक्षक पेशात काम करताना शिक्षण क्षेत्रातील उदासीनतेच्या प्रश्नाने त्यांचे जीवन प्रश्नार्थक होते. आंतरिक तळमळ व कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ घेऊन त्यांनी शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नावर When, Why, Where, What, Who या पाच प्रश्नांचा सातत्याने वापर केला.
आमदार होण्यापूर्वी त्यांनी रस्त्यावरचा लढा उभारून विविध आंदोलने, उपोषणे करून ६०,००० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मंजूर करून घेतले. विविध आंदोलने व उपोषणे करून ४१,१५३ कर्मचारी बांधव-भगिनींना वेतन अनुदान मंजूर करून देण्यात आमदार साहेब यशस्वी झाले आहेत.
आमदार साहेब दररोज किमान १६ ते १८ तास काम करत असतात. शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे, आझाद मैदान मुंबई, संचालक कार्यालय, विधानभवन मुंबई येथे आंदोलने व उपोषणे करून अनेक विषय मार्गी लावले आहेत. अनेक वर्षांपासून बंद असलेले शाळांचे वेतनेतर अनुदान मिळवून दिले आहे. सर्व शाळांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला मिळविण्यासाठी शासन आदेश पारित करून घेतला आहे. वैद्यकीय बिले कॅशलेस योजनेतून मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत.