दत्तात्रय सावंत: भीक मांगो आंदोलनाची शिक्षणमंत्र्यांनी घेतली दखल, शिक्षकांना मार्चमध्ये वेतन

Loading imageदत्तात्रय सावंत: भीक मांगो आंदोलनाची शिक्षणमंत्र्यांनी घेतली दखल, शिक्षकांना मार्चमध्ये वेतन

गेल्या १५ वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या राज्यातील शिक्षकांनी १ डिसेंबरपासून शेगाव ते नागपूर अशी 'भीक मांगो पाय दिंडी' काढली होती. याची दखल घेत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मार्चमध्ये शिक्षकांना वेतन देण्याचे लेखी आश्वासन दिल्याची माहिती पुणे विभागीय शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली आहे. दिंडी नागपूरला पोहोचण्यापूर्वीच शिक्षणमंत्र्यांनी आंदोलकांची भेट घेऊन मागण्या मान्य केल्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले असून, या निर्णयामुळे शिक्षक वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.