१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळण्याबाबतचा आंदोलनाचा दुसरा दिवस आक्रमक

Loading image१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळण्याबाबतचा आंदोलनाचा दुसरा दिवस आक्रमक

मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संच्याच्या वतीने १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले. २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक-कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी आणि २९ नोव्हेंबर २०१० रोजीचा अन्यायकारक निर्णय रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे राज्यव्यापी आंदोलन आक्रमक स्वरूपात पुकारण्यात आले असून यामध्ये राज्यभरातून हजारो शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले आहेत.