दिनांक १५ मे २०२३ रोजी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या चर्चेनुसार जुनी पेन्शन लागू करण्याबाबतचा शासन आदेश निर्गमित करणे बाबत
Loading image

दि. ९/८/२०२३ रोजी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य दत्तात्रय अ. सावंत आणि श्रीकांत गो. देशपांडे यांनी मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांना पत्र लिहून, ३ मे २०२३ ते १५ मे २०२३ या कालावधीत आझाद मैदान मुंबई येथे झालेल्या आंदोलनादरम्यान सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या चर्चेची आठवण करून दिली आहे. १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना देण्याबाबत दिलेल्या अभिवचनानुसार तात्काळ शासन आदेश निर्गमित करावा, बाबतचे पत्र.
