१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत
Loading image

दि. ३०/०१/२०२४ रोजी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य दत्तात्रय अच्युतराब सावंत, बाळाराम पाटील, श्रीकांत देशपांडे आणि किशोर दराडे यांनी मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांना पत्र लिहून १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याविषयी विनंती केली आहे. हिवाळी अधिवेशनातील घोषणेची पूर्तता करून मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने निर्णय घेण्यासाठी मुख्यसचिवांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
